भारतीय पोस्ट खात्यातर्फे प्रत्येक शहरात आणि
खेडेगावात लोंकाच्या दळणवळणाच्या सोयीसाठी पोस्ट कार्यालयांची निर्मिती केली गेली.
१ जुलै १९६८ रोजी १ लाखाव्या पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यानिमित्त
पोस्टाचे तिकीट काढून गौरव करण्यात आला. लाल, निळ्या आणि काळ्या रंगात या तिकीटाची
छपाई करण्यात आली असून २० पैसे त्याची किंमत आहे. हरितक्रांतीच्या प्रकल्पामुळे
गव्हाच्या निर्मितीत चांगली वाढ झाली.
ह्याचे कौतुक करण्यासाठी भारत सरकारने गव्हाच्या लोंब्या आणि अॅग्री रिसर्च
इन्स्टिट्यूटचे चित्र असलेले तिकीट १७ जुलै १९६८ रोजी प्रकाशित केले. हिरवट निळसर
आणि नारंगी ब्राऊन रंगात या तिकीटाची छपाई किली असून २० पैसे यांची किंमत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा