क्रांतिकारक भगतसिंग
यांच्या ६१ व्या जन्मतीथीच्या स्मरणार्थ भारत सरकारने १९ ऑक्टोबर १९६८ रोजी
त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली अर्पण
केली. पिवळ्या आणि ब्राऊन रंगात हे छापलेले असून २० पैसे ह्याची किंमत आहे. २१
ऑक्टोबर १९६८ रोजी आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल
पोस्टाचे तिकीट प्रकाशित करून सन्मान करण्यात आले. गडद निळ्या रंगातील या तिकीटाची
किंमत २० पैसे आहे. स्वामी विवेकानंदांच्या धर्मकन्या भगिनी निवेदिता यांच्या
जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट २७ ऑक्टोबर १९६८ साली प्रकाशित
करण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.गडद निळसर रंगातील या तिकीटाची किंमत
२० पैसे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा