विश्व डाक संघाला १००
वर्ष पूर्ण झाल्याबदद्ल ३ ऑक्टोबर १९७४ साली भारत सरकारने त्यांचे अभिनंदन
करण्यासाठी तीन तिकिटांची मालिका प्रकाशित केली. विश्व डाक संघाचे बोधचिन्ह असलेले
पहिले तिकीट या निमित्ताने प्रकाशित केले. जांभळट निळसर काळ्या रंगात या तिकीटाची
छपाई केली असून त्याची किंमत २५ पैसे आहे. मधुबनी येथील लोखाह्स्तकलेचा नमुना असलेले दुसरे
तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत १ रुपया
आहे. यातील तिसरे तिकीट हे चार रंगात बाणांनी आणि पट्यांनी काढलेल्या स्वस्तिकाचे
असून चार रंगात छपाई केलेल्या या तिकीटाची किंमत २ रुपये आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा