स्काऊट चळवळीला ६० वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल त्याच्या हिरक महोत्सवानिमित्त २७
डिसेंबर, १९६७ रोजी स्काऊटचे सांकेतिक चिन्ह बिगुल आणि सॅल्युट करणाऱ्या हाताचे
चित्र टाकून पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यात आले. विटकरी रंगात छापलेल्या या
तिकीटाची किंमत १५ पैसे आहे. १९६८ हे साल जगभर मानवी हक्क संरक्षण वर्ष म्हणून
साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने १ जानेवारी १९६८ या दिवशी तिकीट प्रकाशित
करण्यात आले. चार व्यक्ती पृथ्वीचा गोल हातात धरून संरक्षण करत आहेत आणि वरच्या
कोपऱ्यात मानवी हक्क संरक्षण संस्थेचे सांकेतिक चिन्ह टाकून गडद हिरव्या रंगात हे
तिकीट छापण्यात आले आहे. त्याची किंमत १५ पैसे आहे. ३ जानेवारी १९६८ रोजी तमिळ
भाषिकांचे आंतरराष्ट्रीय संमेलन (मद्रास) चेन्नई येथे घेण्यात आले. त्यानिमित्त
काढण्यात आलेल्या तिकिटावर संमेलन सांकेतिक चिन्ह आणि गोपुरम् मंदिराचे छायाचित्र
छापण्यात आले आहे. या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा