आंतरराष्ट्रीय महिला
वर्षानिमित्त तिकीट प्रकाशित करून या वर्षाचा गौरव करण्यात आला. दोन कबुत्तर
महिलेच्या हातून मोकळी सोद्तानाचे छायाचित्र असून चार रंगात छपाई केलेले हे तिकीट
१६ फेब्रुवारी १९७५ रोजी प्रकाशित करण्यात आले. या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. ‘इंडियन आर्मी
ऑर्डनन्स कॉर्पोरेशन’ यांच्या द्विवार्षिकमहोत्सवानिमित्त तीन तोफांचे चित्र
असलेले तिकीट ८ एप्रिल, १९७५ रोजी प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छापलेल्या या
तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. आर्य समाज चळवळीला १०० वर्ष पूर्ण झाल्याबदद्ल ११
एप्रिल १९७५ रोजी तिकीट प्रकाशित करून आर्य समाजाचे अभिनंदन करण्यात आले. चाररंगी
छपाई असलेल्या या तिकीटावर यज्ञाचे चित्र असून २५ पैसे त्याची किंमत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा