Translate

शनिवार, ७ एप्रिल, २०१८

विश्व डाक संघाची शताब्दी


विश्व डाक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याबदद्ल ३ ऑक्टोबर १९७४ साली भारत सरकारने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तीन तिकिटांची मालिका प्रकाशित केली. विश्व डाक संघाचे बोधचिन्ह असलेले पहिले तिकीट या निमित्ताने प्रकाशित केले. जांभळट निळसर काळ्या रंगात या तिकीटाची छपाई केली असून त्याची किंमत २५ पैसे आहे. मधुबनी येथील लोखाह्स्तकलेचा नमुना असलेले दुसरे तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत १ रुपया आहे. यातील तिसरे तिकीट हे चार रंगात बाणांनी आणि पट्यांनी काढलेल्या स्वस्तिकाचे असून चार रंगात छपाई केलेल्या या तिकीटाची किंमत २ रुपये आहे.




जतींद्रनाथ मुखर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर, श्रीनिवास शास्त्री


जतींद्रनाथ मुखर्जी यांच्या स्मरणार्थ ३१ ऑगस्ट १९७० रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. चॉकलेटी रंगाची छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. शिक्षणतज्ञ श्रीनिवास शास्त्री यांच्या स्मरणार्थ २२ सप्टेंबर १९७० रोजी पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यात आले. पिवळसर ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. शिक्षणतज्ज्ञ ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ५० व्या जयंती निमित्ताने २६ सप्टेंबर १९७० रोजी तिकीट काढण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. जांभळट- ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.




विष्णु दिगंबर पलुस्कर, डॉ. हानसेन


भारतीय संगीताचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे छायाचित्र असलेले तिकीट हे या जेष्ठांच्या मालिकेतील दुसरे तिकीट प्रकाशित करण्यात आले. जन्म
शताब्दीबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली. लालसर ब्राऊन रंगात छापलेले हे तिकीट ३० पैसे किमतीचे आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. हानसेन यांचे छायाचित्र असलेले हे तिकीट त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने या मालिकेत प्रकाशित करण्यात आले. गडद ब्राऊन रंगातील या तिकीटाची किंमत ५० पैसे आहे.



आंतरराष्ट्रीय महिला वर्ष


आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त तिकीट प्रकाशित करून या वर्षाचा गौरव करण्यात आला. दोन कबुत्तर महिलेच्या हातून मोकळी सोद्तानाचे छायाचित्र असून चार रंगात छपाई केलेले हे तिकीट १६ फेब्रुवारी १९७५ रोजी प्रकाशित करण्यात आले. या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. ‘इंडियन आर्मी ऑर्डनन्स कॉर्पोरेशन’ यांच्या द्विवार्षिकमहोत्सवानिमित्त तीन तोफांचे चित्र असलेले तिकीट ८ एप्रिल, १९७५ रोजी प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. आर्य समाज चळवळीला १०० वर्ष पूर्ण झाल्याबदद्ल ११ एप्रिल १९७५ रोजी तिकीट प्रकाशित करून आर्य समाजाचे अभिनंदन करण्यात आले. चाररंगी छपाई असलेल्या या तिकीटावर यज्ञाचे चित्र असून २५ पैसे त्याची किंमत आहे.



मानवी हक्क संरक्षण वर्ष

स्काऊट चळवळीला ६० वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल त्याच्या हिरक महोत्सवानिमित्त २७ डिसेंबर, १९६७ रोजी स्काऊटचे सांकेतिक चिन्ह बिगुल आणि सॅल्युट करणाऱ्या हाताचे चित्र टाकून पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यात आले. विटकरी रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे. १९६८ हे साल जगभर मानवी हक्क संरक्षण वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने १ जानेवारी १९६८ या दिवशी तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार व्यक्ती पृथ्वीचा गोल हातात धरून संरक्षण करत आहेत आणि वरच्या कोपऱ्यात मानवी हक्क संरक्षण संस्थेचे सांकेतिक चिन्ह टाकून गडद हिरव्या रंगात हे तिकीट छापण्यात आले आहे. त्याची किंमत १५ पैसे आहे. ३ जानेवारी १९६८ रोजी तमिळ भाषिकांचे आंतरराष्ट्रीय संमेलन (मद्रास) चेन्नई येथे घेण्यात आले. त्यानिमित्त काढण्यात आलेल्या तिकिटावर संमेलन सांकेतिक चिन्ह आणि गोपुरम् मंदिराचे छायाचित्र छापण्यात आले आहे. या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे.


आंतरराष्ट्रीय संस्था


२८ नोव्हेंबर, १९७७ रोजी भारतातील दोन प्रसिद्ध समाजसुधारकांची दोन तिकिटांची मालिका प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यातील पहिले तिकीट हे प्रसिद्ध समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांचे असून त्यांच्या छायाचित्रासह ब्राऊन आणि ऑलिव्ह रंगात छापण्यात आलेले हे तिकीट २५ पैसे किमतीचे आहे. या मालिकेतील दुसरे तिकीट हे स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांचे असून त्यांच्या छायाचित्रासह लालसर रंगात छापण्यात आलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय संस्थेला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या संस्थेची काही बोधचिन्ह असलेले हे तिकीट १३ डिसेंबर, १९७७ रोजी प्रकाशित करण्यात आले. अनेकरंगी छपाई असलेल्या या तिकीटाची किमंत २ रुपये आहे.

गुरुवार, २२ मार्च, २०१८

स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव


‘इंडिपेक्स ७३’ या नावानी भरविण्यात आलेल्या भारतीय पोस्टाच्या तिकीटांच्या प्रदर्शनासाठी एक अतिशय सुंदर असे बोधचिन्ह तयार करण्यात आले होते. ह्या बोधचिन्हाच्या चित्राचे पोस्टाचे तिकीट काढण्यात येऊन या उपक्रमाचे अभिनंदन करण्यात आले. ८ जानेवारी १९७३ रोजी प्रकाशित केलेल्या या तिकीटाची छपाई चार रंगात केलेली असून त्यावर सोनेरी वर्खाने सजविले आहे. या तिकीटाची किंमत १ रुपया ४५ पैसे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून २५ वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. या रौप्य महोत्सवी आनंदाप्रीत्यर्थ भारत सरकारने दोन तिकीटांची मालिका प्रस्तुत केली. त्यापैकी एका तिकिटावर भारतीय परंपरागत पद्धतीची रचनाचित्र दाखविण्यात आली असून चार रंगात छपाई करण्यात आलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.