भारतीय प्रादेशिक सेनेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने १६ नोव्हेंबर१९७४
रोजी पोस्टाचे तिकीट प्रकाशित करून भारत सरकारने प्रादेशिक सेनेचे कौतुक केले आहे.
या तिकिटावर प्रादेशिक सेनेचे बोधचिन्ह असून पिवळ्या, हिरवट आणि काळ्या रंगात छपाई
असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. आंतरराष्ट्रीय डेअरी कॉग्रेस, नवी दिल्ली
यांच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने २ डिसेंबर १९७४ रोजी तिकीट प्रकाशित
करण्यात आले. कापडावर हातछपाईने केलेल्या गाईच्या चित्राचे राजस्थानी आर्ट मधील
चित्र टाकून हे तिकीट प्रकाशित करण्यात करण्यात आले. चार रंगात छपाई केलेल्या या
तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.
Translate
शनिवार, १७ मार्च, २०१८
कमला नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या स्मरणार्थ १ ऑगस्ट
१९७४ रोजी कमला नेहरू यांचे रंगीत छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करून त्यांना
आदरांजली वाहण्यात आली. चारारंगी छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.
१९७४ साल हे विश्व जनसंख्या वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्या निमित्ताने विश्व
जनसंख्येचे बोधचिन्ह असलेले तिकीट प्रकाशित करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
पिवळ्या आणि ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. भारताचे
भूतपूर्व राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या सन्मानार्थ त्यांचे छायाचित्र
असलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे
आहे.
नमिबिया दिवस
अरुणगिरी नाथर यांच्या ६०० व्या जयंतीनिमित्त १४ ऑगस्ट १९७५ रोजी त्यांच्या
छायाचित्रासह तिकीट प्रकाशित करून त्यांना वंदन करण्यात आले. फिक्या जांभळ्या आणि
काळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत ५० पैसे आहे. २६ ऑगस्ट १९७५ रोजी
नमिबिया दिनानिमित्त तिकीट प्रकाशित करण्यात येऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
लाल, राखाडी, काळ्या रंगात छापलेल्या
या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. इतिहास प्रसिद्ध कर्तबगार महीला अहिल्याबाई होळकर
यांच्या मंदिराचे छायाचित्र असलेले तिकीट ४ सप्टेंबर १९७५ रोजी प्रकाशित करण्यात
आले. फिक्या लाल रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.
रामचरित मानस
२८ एप्रिल १९७५ रोजी विविधरंगी अशा पक्षांच्या चार तिकिटांची मालिका प्रसिद्ध
करण्यात आली. त्यापैकी तिसऱ्या नंबरचे तिकीट हे मोनल या पक्षाचे असून त्यावर
मोरपंखी, लाल, पिवळा आणि कला रंग असलेल्या या सौंदर्यवान अशा पक्षाचे चित्र आहे.
चार रंगात छपाई केलेल्या या तिकीटाची किंमत २ रुपये आहे. त्यानंतर मालिकेतील चौथे
तिकीट हे परिपक्ष या पक्षाचे असून पिवळ्या आणि काळ्या रंगाचे सौंदर्य जपलेला हा
पक्षी, या तीकीटावरही उठून दिसतो. चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत ५०
पैसे आहे. ‘रामचरित मानस’ या ग्रंथाच्या गौरवार्थ २४ मे १९७५ रोजी या तिकीटाची
निर्मिती करण्यात आली. चार रंगात छपाई असलेल्या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.
वंदे मातरम्
बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम् या काव्याच्या स्मरणार्थ तिरंगी
झेंड्याचे तीन पट्टे असलेल्या पांढऱ्या भागात हे काव्य लिहून वरच्या भागाला भगवा
पट्टा व खालच्या बाजूस हिरवा पट्टा अशी छायाचित्र असलेले हे तिकीट ३० डिसेंबर,
१९७६ रोजी प्रकाशित करण्यात आले. चाररंगी छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे
आहे. ६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त ३ जानेवारी, १९७७ रोजी तिकीट
प्रकाशित करण्यात आले. पृथ्वीचा अर्धा गोल आणि चीत्रफिती असलेल्या या चाररंगी
तिकीटाची किंमत २ रुपये आहे. नवी दिल्ली येथे ६ व्या जागतिक भूकंप इंजिनिअरिंग
शिबिराच्या निमित्ताने, १० जानेवारी, १९७७ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. यावर
काही यंत्र आणि पृथ्वीचा गोल यांचे छायाचित्र असून राखाडी, काळ्या रंगात छापलेल्या
या तिकीटाची किंमत २ रुपये आहे.
जलउषा, अब्राहम लिंकन
५ एप्रिल १९६५ रोजी राष्ट्रीय सागर दिनाच्या निमित्ताने विशाखापट्टणम येथे
जलउषा ही मालवाहतूक बोट राष्ट्राला अर्पण करण्यात आली. त्यानिमित्ताने जलउषा या
मालवाहतूक बोटीच्या छायाचित्राचे तिकीट काढण्यात आले. १५ पैसे किमतीचे हे तिकीट
असून ते निळ्या रंगात छापण्यात आलेले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम
लिंकन यांच्या निधनाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्त त्यांच्या छायाचित्राचे तिकीट
१५ एप्रिल १९६५ रोजी काढण्यात आले. १५ पैसे किमतीचे हे तिकीट असून ब्राऊन आणि
पिवळ्या रंगात ते छापले आहे. १७ मे १९६५ रोजी आय.टी.यू. चे बोधचिन्ह असलेले १५ पैसे
किमतीचे तिकीट काढण्यात आले.
ऑल अप
उस्मानिया विद्यापीठाच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्याच्या
गौरवार्थ विद्यापीठाचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले. ऑलिव्ह
हिरव्या रंगात या तिकीटाची छपाई करण्यात आलेली असून २० पैसे किमतीचे हे तिकीट आहे.
विमानाने टपाल पाठविण्याच्या भारतातील या योजनेचे प्रवर्तक रफी अहमद किडवाई यांचे छायाचित्राबरोबर हवाई टपाल
योजनेचे विमान असे चित्र टाकून ‘ऑल अप’ या त्यांच्या चळवळीच्या विसाव्या वर्धापन
दिनानिमित्त १ एप्रिल १९६९ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. गडद निळ्या रंगातील
या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)






