पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या स्मरणार्थ १ ऑगस्ट
१९७४ रोजी कमला नेहरू यांचे रंगीत छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करून त्यांना
आदरांजली वाहण्यात आली. चारारंगी छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.
१९७४ साल हे विश्व जनसंख्या वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्या निमित्ताने विश्व
जनसंख्येचे बोधचिन्ह असलेले तिकीट प्रकाशित करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
पिवळ्या आणि ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. भारताचे
भूतपूर्व राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या सन्मानार्थ त्यांचे छायाचित्र
असलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा