५ एप्रिल १९६५ रोजी राष्ट्रीय सागर दिनाच्या निमित्ताने विशाखापट्टणम येथे
जलउषा ही मालवाहतूक बोट राष्ट्राला अर्पण करण्यात आली. त्यानिमित्ताने जलउषा या
मालवाहतूक बोटीच्या छायाचित्राचे तिकीट काढण्यात आले. १५ पैसे किमतीचे हे तिकीट
असून ते निळ्या रंगात छापण्यात आलेले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम
लिंकन यांच्या निधनाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्त त्यांच्या छायाचित्राचे तिकीट
१५ एप्रिल १९६५ रोजी काढण्यात आले. १५ पैसे किमतीचे हे तिकीट असून ब्राऊन आणि
पिवळ्या रंगात ते छापले आहे. १७ मे १९६५ रोजी आय.टी.यू. चे बोधचिन्ह असलेले १५ पैसे
किमतीचे तिकीट काढण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा