उस्मानिया विद्यापीठाच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्याच्या
गौरवार्थ विद्यापीठाचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले. ऑलिव्ह
हिरव्या रंगात या तिकीटाची छपाई करण्यात आलेली असून २० पैसे किमतीचे हे तिकीट आहे.
विमानाने टपाल पाठविण्याच्या भारतातील या योजनेचे प्रवर्तक रफी अहमद किडवाई यांचे छायाचित्राबरोबर हवाई टपाल
योजनेचे विमान असे चित्र टाकून ‘ऑल अप’ या त्यांच्या चळवळीच्या विसाव्या वर्धापन
दिनानिमित्त १ एप्रिल १९६९ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. गडद निळ्या रंगातील
या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा