अरुणगिरी नाथर यांच्या ६०० व्या जयंतीनिमित्त १४ ऑगस्ट १९७५ रोजी त्यांच्या
छायाचित्रासह तिकीट प्रकाशित करून त्यांना वंदन करण्यात आले. फिक्या जांभळ्या आणि
काळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत ५० पैसे आहे. २६ ऑगस्ट १९७५ रोजी
नमिबिया दिनानिमित्त तिकीट प्रकाशित करण्यात येऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
लाल, राखाडी, काळ्या रंगात छापलेल्या
या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. इतिहास प्रसिद्ध कर्तबगार महीला अहिल्याबाई होळकर
यांच्या मंदिराचे छायाचित्र असलेले तिकीट ४ सप्टेंबर १९७५ रोजी प्रकाशित करण्यात
आले. फिक्या लाल रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा