‘अॅग्री एक्स्पो ७७’ ह्या दिल्लीत भरविण्यात आलेल्या शेतीप्रदर्शनाच्या
निमित्ताने भारतातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी १३ नोव्हेंबर, १९७७ रोजी तिकीट
प्रकाशित करण्यात आले. मक्याचे कणीस आणि त्याचे तंतू याचे शेतकी विषयक बोधचिन्ह असलेले
तिकीट निळसर हिरवट रंगात छापण्यात आले असून त्याची किंमत २५ पैसे आहे. राष्ट्रीय
बालकदिनानिमित्त १४ नोव्हेंबर, १९७७ रोजी दोन तिकिटांची मालिका प्रकाशित करण्यात
आली. त्यातील पहिले तिकिट हे लहान मुलांनी काढलेल्या चित्राचे असून चार रंगात
छापण्यात आले आहे. याची किंमत २५ पैसे आहे. ह्या मालिकेतील दुसरे तिकीट बाकावर
बसलेल्या दोन मित्रांचे चित्र असून हे ही चित्र लहान मुलांनीच काढलेले आहे.
चाररंगी छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत १ रुपया आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा