बेट्होवन यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने १६ डिसेंबर १९७० रोजी तिकीट प्रकाशित
करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नारंगी व राखाडी काळ्या रंगात छापण्यात आलेल्या
या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. भारतीय डाक तिकीट प्रदर्शनाच्या निमित्ताने दोन
तिकीटाची मालिका प्रकाशित करण्यात आली. पहिल्या तिकिटावर दोन लहान मुले
प्रदर्शनातील तिकिटांचे निरीक्षण करतानाचे छायाचित्र असून ते चार रंगात छापलेले
आहे. या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.
मालिकेतील दुसरे तिकीट हे तिकीट धरलेला हात आणि बहिग्रोल भिंगाने तिकिटाचे
निरीक्षण करतानाचे छायाचित्र असलेले चार रंगात छापलेले हे तिकीट असून त्याची किंमत
१ रुपया आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा