डॉ. मॅान्टेसरी
संयुक्त राष्ट्र संघाचा २५ व्या वर्धापन दिनानिमित्त २६ जून १९७० रोजी
पृथ्वीचा गोल आणि संयुक्त राष्ट्र संघाचे बोधचिन्ह असलेले तिकीट प्रकाशित करण्यात
आले. न्यू ब्ल्यू रंगात हे छापण्यात आले असून त्याची किंमत २० पैसे आहे. १९७० हे
वर्ष आशियाई उत्पादकता वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने
कारखान्यांचे चिन्ह आणि उत्पादकतेचे बोधचिन्ह टाकून १८ ऑगस्ट १९७० रोजी हे तिकिट
प्रकाशित करण्यात आले. व्हायोलेट रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.
शिक्षणतज्ज्ञ मारिया मॅान्टेसरी यांच्या जन्मशताब्दी निमित्त शैक्षणिक बोधचिन्ह
आणि मारिया मॅान्टेसरि यांचे छायाचित्र टाकून ३१ ऑगस्ट १९७० रोजी तिकीट प्रकाशित
करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. हलक्या जांभाळ्या रंगात छापलेल्या या
तिकीटाची किंमत २० पैसे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा