प्रसिद्ध कवी अमीर खुसरो यांच्या ६५० व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या
स्मरणार्थ त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट २४ ऑक्टोबर, १९७५ रोजी प्रकाशित करण्यात
आले. लालसर ब्राऊन आणि पिवळ्या रंगात छापण्यात आलेल्या या तिकीटाची किंमत ५० पैसे
आहे. माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त
त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट २४
ऑक्टोबर, १९७५ रोजी प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ऑलिव्ह ग्रीन
आणि काळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. बहादुरशाह जफर यांच्या
जयंती निमित्ताने २४ ऑक्टोबर, १९७५ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. या तिकीटाची
बहादुरशाह जफर यांनी उर्दूत लिहलेल्या काव्यपंक्ती असून पिवळसर ब्राऊन, काळ्या
रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत १ रुपया आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा