नवीन विश्व डाक संघाच्या मुख्य कार्यलयाच्या इमारतीच्या छायाचित्राचे तिकीट २०
मे १९७० रोजी प्रकाशित करण्यात आले. हिरव्या काळ्या रंगात छापण्यात आलेल्या या
तिकीटाची किंमत २० पैसे आहे. शेर शहासूरी या १५ व्या शतकातील राज्यकर्त्याच्या
स्मरणार्थ २२ मे १९७० रोजी त्यांचे छायाचित्राचे तिकीट प्रकाशित करण्यात आले. हिरव्या रंगात छापण्यात
आलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य
समर्पित करणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ८७ व्या
जयंतीनिमित्त सावरकर यांचे छायाचित्र आणि अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत
असताना ते ज्या तुरुंगात होते त्या सेल्यूलर जेलचे चित्र अशा एकत्र छायाचित्राचे
पोस्टाचे तिकीट प्रकाशित करून त्या स्वातंत्र्य सूर्याला आदरांजली अर्पण करण्यात
आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा