१९७६ मध्ये २१ व्या ऑलिम्पिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
त्या निमित्ताने भारत सरकारने ऑलिम्पिक खेळांवर आधारित असलेली चार तिकिटांची
मालिका १७ जुलै, १९७६ रोजी प्रस्तुत केली. त्यापैकी पहिल्या तिकिटावर ऑलिम्पिकचे
पाच कडी असलेले बोधचिन्ह गोलातील चौकोनात दर्शवून ऑलिम्पिक स्पर्धाची ओळख करून
दिली आहे. चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. या मालिकेतील
दोन नंबरच्या तिकिटात यातील अनेक स्पर्धामधील गोळाफेक या स्पर्धेतील संकेतात्मक
चित्र या तिकिटावर घेण्यात आले असून त्या खाली ऑलिम्पिकचे पाच कडी असलेले बोधचिन्ह
दर्शविले आहे. चाररंगी छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत १ रुपया आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा