जहाज बांधणीचे प्रसिद्ध भारतीय इंजिनियर ए. सी. वाडिया यांच्या स्मरणार्थ २७
मे १९६९ रोजी पोस्टाचे तिकीट काढण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यावर
वाडिया यांच्या छायाचित्रा समवेत पाण्यावर तरंगणारी जहाजे दाखविण्यात आली आहेत.
काळसर हिरव्या रंगात या तिकीटाची छपाई असून २० पैसे किंमत आहे. श्रीरामपूर कॉलेजला
१५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ७ जून १९६९ रोजी पोस्टाचे
तिकीट प्रकाशित केले. या तिकीटावर कॉलेज इमारतीचे छायाचित्र टाकण्यात आले असून
जांभळट ब्राऊन रंगात याची छपाई करण्यात आली आहे. २० पैसे किमतीचे हे तिकीट आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा