१५ डिसेंबर १९६८ या दिवशी नौसेना दिनाच्या निमित्ताने भारतीय नौदलातील लढाऊ
जहाज ‘निलगिरी’ याचे छायाचित्र छापून नौसेना दलाचा गौरव व्यक्त करण्यासाठी तिकीट
प्रकाशित करण्यात आले. निळसर ग्रे रंगात हे तिकीट छापलेले असून २० पैसे किमतीचे
आले. त्यानंतर रंगीबेरंगी अशा सुंदर पक्षांची चार तिकीटाची मालिका ३१ डिसेंबर १९६८
रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यातील पहिले तिकीट हे लांब शेपटी, मानेशी नीळा रंग
आणि पिवळी चोच असलेल्या ‘नीलकंठ’ पक्षाचे प्रकाशित करण्यात आले. चार रंगी छपाई
असलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. दुसरे तिकीट लांब चोच, डोक्यावर लाल
तुरा, ब्राऊन रंगाचे पंख आणि पोटाशी बिस्कीट रंग असलेल्या कठफोडा पक्षाच्या
छायाचित्राचे छापण्यात आले असून या तिकीटाची किंमत ५० पैसे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा