बिहारचे नेते व माजी मंत्री ललित नारायण मिश्र यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त
त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ३ जानेवारी १९७६ रोजी त्यांचे छायाचित्र असलेले
तिकीट प्रकाशित करण्यात आले. ब्राऊन, ग्रे, पर्पल आणि काळ्या रंगात छापलेल्या या
तिकिटाची किंमत २५ पैसे आहे. जिम कार्बेट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाघाचे चित्र
असलेले तिकीट २४ जानेवारी १९७६ रोजी प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छपाई
असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. भरतपूर येथील पक्षी भरण स्थळातील
पक्षांचे छायाचित्र असलेले तिकीट १० फेब्रुवारी, १९७६ रोजी प्रकाशित करण्यात आले.
चार रंगातील या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा