Translate

शनिवार, ७ एप्रिल, २०१८

ब्रिटीश शास्त्रज्ञ मेरी क्युरी


‘रेडियम’ चा शोध आणि वैद्यकिय व्यवसायात क्रांती घडवून आणणारा ‘क्ष’ किरणांचा शोध लावणाऱ्या प्रसिद्ध ब्रिटीश शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकारने या ब्रिटीश शास्त्रज्ञ महिलेच्या छायाचित्राचे तिकीट ६ नोव्हेंबर १९६८ रोजी प्रकाशित करून त्यांचा गौरव केला. काळसर जांभळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. १ डिसेंबर १९६८ रोजी आंतरराष्ट्रीय भौगोलिक कॉग्रेस या संस्थेसाठी जगाचा नकाशा असलेले तिकीट काढण्यात आले. हे न्यू ब्लू रंगात छापलेले असून २० पैसे किमतीचे तिकीट आहे. कोचिन येथील ज्यू लोकांच्या उपासना स्थानाला ४०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यासाठी आदर व्यक्त करण्यासाठी १५ डिसेंबर १९६८ ला कोचिन सिनागोगचे छायाचित्र टाकून तिकीट प्रकाशित करण्यात आले. कारमाइन आणि निळसर रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.




आजाद हिंद सेनेची २५ वर्षे


क्रांतिकारक भगतसिंग यांच्या ६१ व्या जन्मतीथीच्या स्मरणार्थ भारत सरकारने १९ ऑक्टोबर १९६८ रोजी त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली अर्पण केली. पिवळ्या आणि ब्राऊन रंगात हे छापलेले असून २० पैसे ह्याची किंमत आहे. २१ ऑक्टोबर १९६८ रोजी आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पोस्टाचे तिकीट प्रकाशित करून सन्मान करण्यात आले. गडद निळ्या रंगातील या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. स्वामी विवेकानंदांच्या धर्मकन्या भगिनी निवेदिता यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट २७ ऑक्टोबर १९६८ साली प्रकाशित करण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.गडद निळसर रंगातील या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.



विश्व डाक संघाची शताब्दी


विश्व डाक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याबदद्ल ३ ऑक्टोबर १९७४ साली भारत सरकारने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तीन तिकिटांची मालिका प्रकाशित केली. विश्व डाक संघाचे बोधचिन्ह असलेले पहिले तिकीट या निमित्ताने प्रकाशित केले. जांभळट निळसर काळ्या रंगात या तिकीटाची छपाई केली असून त्याची किंमत २५ पैसे आहे. मधुबनी येथील लोखाह्स्तकलेचा नमुना असलेले दुसरे तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत १ रुपया आहे. यातील तिसरे तिकीट हे चार रंगात बाणांनी आणि पट्यांनी काढलेल्या स्वस्तिकाचे असून चार रंगात छपाई केलेल्या या तिकीटाची किंमत २ रुपये आहे.




जतींद्रनाथ मुखर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर, श्रीनिवास शास्त्री


जतींद्रनाथ मुखर्जी यांच्या स्मरणार्थ ३१ ऑगस्ट १९७० रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. चॉकलेटी रंगाची छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. शिक्षणतज्ञ श्रीनिवास शास्त्री यांच्या स्मरणार्थ २२ सप्टेंबर १९७० रोजी पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यात आले. पिवळसर ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. शिक्षणतज्ज्ञ ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ५० व्या जयंती निमित्ताने २६ सप्टेंबर १९७० रोजी तिकीट काढण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. जांभळट- ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.




विष्णु दिगंबर पलुस्कर, डॉ. हानसेन


भारतीय संगीताचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे छायाचित्र असलेले तिकीट हे या जेष्ठांच्या मालिकेतील दुसरे तिकीट प्रकाशित करण्यात आले. जन्म
शताब्दीबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली. लालसर ब्राऊन रंगात छापलेले हे तिकीट ३० पैसे किमतीचे आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. हानसेन यांचे छायाचित्र असलेले हे तिकीट त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने या मालिकेत प्रकाशित करण्यात आले. गडद ब्राऊन रंगातील या तिकीटाची किंमत ५० पैसे आहे.



आंतरराष्ट्रीय महिला वर्ष


आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त तिकीट प्रकाशित करून या वर्षाचा गौरव करण्यात आला. दोन कबुत्तर महिलेच्या हातून मोकळी सोद्तानाचे छायाचित्र असून चार रंगात छपाई केलेले हे तिकीट १६ फेब्रुवारी १९७५ रोजी प्रकाशित करण्यात आले. या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. ‘इंडियन आर्मी ऑर्डनन्स कॉर्पोरेशन’ यांच्या द्विवार्षिकमहोत्सवानिमित्त तीन तोफांचे चित्र असलेले तिकीट ८ एप्रिल, १९७५ रोजी प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. आर्य समाज चळवळीला १०० वर्ष पूर्ण झाल्याबदद्ल ११ एप्रिल १९७५ रोजी तिकीट प्रकाशित करून आर्य समाजाचे अभिनंदन करण्यात आले. चाररंगी छपाई असलेल्या या तिकीटावर यज्ञाचे चित्र असून २५ पैसे त्याची किंमत आहे.



मानवी हक्क संरक्षण वर्ष

स्काऊट चळवळीला ६० वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल त्याच्या हिरक महोत्सवानिमित्त २७ डिसेंबर, १९६७ रोजी स्काऊटचे सांकेतिक चिन्ह बिगुल आणि सॅल्युट करणाऱ्या हाताचे चित्र टाकून पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यात आले. विटकरी रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे. १९६८ हे साल जगभर मानवी हक्क संरक्षण वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने १ जानेवारी १९६८ या दिवशी तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार व्यक्ती पृथ्वीचा गोल हातात धरून संरक्षण करत आहेत आणि वरच्या कोपऱ्यात मानवी हक्क संरक्षण संस्थेचे सांकेतिक चिन्ह टाकून गडद हिरव्या रंगात हे तिकीट छापण्यात आले आहे. त्याची किंमत १५ पैसे आहे. ३ जानेवारी १९६८ रोजी तमिळ भाषिकांचे आंतरराष्ट्रीय संमेलन (मद्रास) चेन्नई येथे घेण्यात आले. त्यानिमित्त काढण्यात आलेल्या तिकिटावर संमेलन सांकेतिक चिन्ह आणि गोपुरम् मंदिराचे छायाचित्र छापण्यात आले आहे. या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे.


आंतरराष्ट्रीय संस्था


२८ नोव्हेंबर, १९७७ रोजी भारतातील दोन प्रसिद्ध समाजसुधारकांची दोन तिकिटांची मालिका प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यातील पहिले तिकीट हे प्रसिद्ध समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांचे असून त्यांच्या छायाचित्रासह ब्राऊन आणि ऑलिव्ह रंगात छापण्यात आलेले हे तिकीट २५ पैसे किमतीचे आहे. या मालिकेतील दुसरे तिकीट हे स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांचे असून त्यांच्या छायाचित्रासह लालसर रंगात छापण्यात आलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय संस्थेला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या संस्थेची काही बोधचिन्ह असलेले हे तिकीट १३ डिसेंबर, १९७७ रोजी प्रकाशित करण्यात आले. अनेकरंगी छपाई असलेल्या या तिकीटाची किमंत २ रुपये आहे.

गुरुवार, २२ मार्च, २०१८

स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव


‘इंडिपेक्स ७३’ या नावानी भरविण्यात आलेल्या भारतीय पोस्टाच्या तिकीटांच्या प्रदर्शनासाठी एक अतिशय सुंदर असे बोधचिन्ह तयार करण्यात आले होते. ह्या बोधचिन्हाच्या चित्राचे पोस्टाचे तिकीट काढण्यात येऊन या उपक्रमाचे अभिनंदन करण्यात आले. ८ जानेवारी १९७३ रोजी प्रकाशित केलेल्या या तिकीटाची छपाई चार रंगात केलेली असून त्यावर सोनेरी वर्खाने सजविले आहे. या तिकीटाची किंमत १ रुपया ४५ पैसे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून २५ वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. या रौप्य महोत्सवी आनंदाप्रीत्यर्थ भारत सरकारने दोन तिकीटांची मालिका प्रस्तुत केली. त्यापैकी एका तिकिटावर भारतीय परंपरागत पद्धतीची रचनाचित्र दाखविण्यात आली असून चार रंगात छपाई करण्यात आलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.




१ लाखावे पोस्ट कार्यालय


भारतीय पोस्ट खात्यातर्फे प्रत्येक शहरात आणि खेडेगावात लोंकाच्या दळणवळणाच्या सोयीसाठी पोस्ट कार्यालयांची निर्मिती केली गेली. १ जुलै १९६८ रोजी १ लाखाव्या पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यानिमित्त पोस्टाचे तिकीट काढून गौरव करण्यात आला. लाल, निळ्या आणि काळ्या रंगात या तिकीटाची छपाई करण्यात आली असून २० पैसे त्याची किंमत आहे. हरितक्रांतीच्या प्रकल्पामुळे गव्हाच्या निर्मितीत चांगली वाढ झाली.  ह्याचे कौतुक करण्यासाठी भारत सरकारने गव्हाच्या लोंब्या आणि अॅग्री रिसर्च इन्स्टिट्यूटचे चित्र असलेले तिकीट १७ जुलै १९६८ रोजी प्रकाशित केले. हिरवट निळसर आणि नारंगी ब्राऊन रंगात या तिकीटाची छपाई किली असून २० पैसे यांची किंमत आहे.



थीरू अण्णादुराई


सी सी आय आर कम्युनिकेशनच्या १२ व्या जागतिक संमेलनानिमित्त भारत सरकारने पृथ्वीचा गोल आणि त्यांचे बोधचिन्ह असलेले चित्र टाकून २१ जानेवारी १९७० रोजी तिकीट प्रकाशित केले. पर्शियन ब्ल्यु रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. प्रसिद्ध राजनीतिज्ञ थीरू अण्णादुराई यांच्या पहिल्या पुण्यतीथी निमित्त त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट फेब्रुवारी १९७० या दिवशी प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रसिद्ध प्रकाशक मुन्शी नवल किशोर यांच्या स्मरणार्थ १९ फेब्रुवारी १९७० रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले असून मुन्शी नवल किशोर यांचे छायाचित्र आणि प्रिंटींग फ्लांन्ट असे चित्र छापण्यात आले आहे. लालसर ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.




मॅक्झिम गोर्की, अमृत बझार


व्यवसाय आणि त्यातील प्रगती या विषयावर युनायटेड नेशन्सतर्फे संमेलन घेण्यात आले. त्याचे अभिनंदन करण्यासाठी १ फेब्रुवारी १९६८ रोजी युनायटेड नेशन्सचे सांकेतिक चिन्ह, विमान आणि जहाज ही चिन्ह टाकून तिकीट प्रकाशित करण्यात आले. हिरवट निळसर रंगातील या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे. ‘अमृत बझार पत्रिका’ या वर्तमानपत्राला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या शतक महोत्सवानिमित्त २० फेब्रुवारी १९६८ रोजी पोस्टाचे तिकीट काढून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सेपिया, नारिंगी पिवळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे. २८ मार्च १९६८ रोजी मॅक्झिम गोर्की यांच्या स्मरणार्थ तिकीट काढण्यात आले असून प्लम रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत १५ पैसे आहे.




२१ वे राष्ट्रमंडल सम्मेलन


२१ व्या राष्ट्रमंडल संसदीय संम्मेलन, नवी दिल्ली यांच्या गौरवार्थ २८ ऑक्टोबर, १९७५ रोजी हे तिकीट प्रकाशित करण्यात आले. ऑलिव्ह ग्रीन आणि काळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २ रुपये आहे. भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने ३१ ऑक्टोबर, १९७५ रोजी वल्लभभाई पटेल यांच्या गौरवार्थ त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले. हिरवट रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. राजकीय नेते नवीनचंद्र बरदलै यांच्या जन्मशताब्दी निमित्त ३ नोव्हेंबर, १९७५ रोजी त्यांच्या छायाचित्राचे तिकीट प्रकाशित करण्यात आले असून लालसर ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.




मार्कोनी


मतिमंद मुलांना सहयोग करण्यासाठी या तिकीटाची निर्मिती ८ डिसेंबर १९७४ रोजी करण्यात आली. मतिमंदांसाठी एक सांकेतिक बोधचिन्ह असलेले हे तिकीट नारंगी आणि काळ्या रंगात छापलेले असून त्याची किंमत २५ पैसे आहे. रेडिओचे संशोधक मार्कोनी यांच्या जन्मशताब्दीबद्दल हे तिकीट १२ डिसेंबर १९७४ रोजी प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांचे छायाचित्र असलेले हे तिकीट गडद हिरवट रंगात छापण्यात आले असून त्यांची किंमत २ रुपये आहे. सेंट फ्रान्सिस झेविअर्स यांच्या स्मरणार्थ २४ डिसेंबर १९७४ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले असून चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.



शनिवार, १७ मार्च, २०१८

प्रादेशिक सेनेचा रौप्य महोत्सव, आंतरराष्ट्रीय डेअरी कॉग्रेस

भारतीय प्रादेशिक सेनेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने १६ नोव्हेंबर१९७४ रोजी पोस्टाचे तिकीट प्रकाशित करून भारत सरकारने प्रादेशिक सेनेचे कौतुक केले आहे. या तिकिटावर प्रादेशिक सेनेचे बोधचिन्ह असून पिवळ्या, हिरवट आणि काळ्या रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. आंतरराष्ट्रीय डेअरी कॉग्रेस, नवी दिल्ली यांच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने २ डिसेंबर १९७४ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. कापडावर हातछपाईने केलेल्या गाईच्या चित्राचे राजस्थानी आर्ट मधील चित्र टाकून हे तिकीट प्रकाशित करण्यात करण्यात आले. चार रंगात छपाई केलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.



कमला नेहरू

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या स्मरणार्थ १ ऑगस्ट १९७४ रोजी कमला नेहरू यांचे रंगीत छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. चारारंगी छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. १९७४ साल हे विश्व जनसंख्या वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्या निमित्ताने विश्व जनसंख्येचे बोधचिन्ह असलेले तिकीट प्रकाशित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. पिवळ्या आणि ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या सन्मानार्थ त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. 


नमिबिया दिवस

अरुणगिरी नाथर यांच्या ६०० व्या जयंतीनिमित्त १४ ऑगस्ट १९७५ रोजी त्यांच्या छायाचित्रासह तिकीट प्रकाशित करून त्यांना वंदन करण्यात आले. फिक्या जांभळ्या आणि काळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत ५० पैसे आहे. २६ ऑगस्ट १९७५ रोजी नमिबिया दिनानिमित्त तिकीट प्रकाशित करण्यात येऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. लाल, राखाडी, काळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. इतिहास प्रसिद्ध कर्तबगार महीला अहिल्याबाई होळकर यांच्या मंदिराचे छायाचित्र असलेले तिकीट ४ सप्टेंबर १९७५ रोजी प्रकाशित करण्यात आले. फिक्या लाल रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.



रामचरित मानस

२८ एप्रिल १९७५ रोजी विविधरंगी अशा पक्षांच्या चार तिकिटांची मालिका प्रसिद्ध करण्यात आली. त्यापैकी तिसऱ्या नंबरचे तिकीट हे मोनल या पक्षाचे असून त्यावर मोरपंखी, लाल, पिवळा आणि कला रंग असलेल्या या सौंदर्यवान अशा पक्षाचे चित्र आहे. चार रंगात छपाई केलेल्या या तिकीटाची किंमत २ रुपये आहे. त्यानंतर मालिकेतील चौथे तिकीट हे परिपक्ष या पक्षाचे असून पिवळ्या आणि काळ्या रंगाचे सौंदर्य जपलेला हा पक्षी, या तीकीटावरही उठून दिसतो. चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत ५० पैसे आहे. ‘रामचरित मानस’ या ग्रंथाच्या गौरवार्थ २४ मे १९७५ रोजी या तिकीटाची निर्मिती करण्यात आली. चार रंगात छपाई असलेल्या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.


वंदे मातरम्

बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम् या काव्याच्या स्मरणार्थ तिरंगी झेंड्याचे तीन पट्टे असलेल्या पांढऱ्या भागात हे काव्य लिहून वरच्या भागाला भगवा पट्टा व खालच्या बाजूस हिरवा पट्टा अशी छायाचित्र असलेले हे तिकीट ३० डिसेंबर, १९७६ रोजी प्रकाशित करण्यात आले. चाररंगी छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. ६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त ३ जानेवारी, १९७७ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. पृथ्वीचा अर्धा गोल आणि चीत्रफिती असलेल्या या चाररंगी तिकीटाची किंमत २ रुपये आहे. नवी दिल्ली येथे ६ व्या जागतिक भूकंप इंजिनिअरिंग शिबिराच्या निमित्ताने, १० जानेवारी, १९७७ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. यावर काही यंत्र आणि पृथ्वीचा गोल यांचे छायाचित्र असून राखाडी, काळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २ रुपये आहे.




जलउषा, अब्राहम लिंकन

५ एप्रिल १९६५ रोजी राष्ट्रीय सागर दिनाच्या निमित्ताने विशाखापट्टणम येथे जलउषा ही मालवाहतूक बोट राष्ट्राला अर्पण करण्यात आली. त्यानिमित्ताने जलउषा या मालवाहतूक बोटीच्या छायाचित्राचे तिकीट काढण्यात आले. १५ पैसे किमतीचे हे तिकीट असून ते निळ्या रंगात छापण्यात आलेले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या निधनाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्त त्यांच्या छायाचित्राचे तिकीट १५ एप्रिल १९६५ रोजी काढण्यात आले. १५ पैसे किमतीचे हे तिकीट असून ब्राऊन आणि पिवळ्या रंगात ते छापले आहे. १७ मे १९६५ रोजी आय.टी.यू. चे बोधचिन्ह असलेले १५ पैसे किमतीचे तिकीट काढण्यात आले.


ऑल अप

उस्मानिया विद्यापीठाच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्याच्या गौरवार्थ विद्यापीठाचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले. ऑलिव्ह हिरव्या रंगात या तिकीटाची छपाई करण्यात आलेली असून २० पैसे किमतीचे हे तिकीट आहे. विमानाने टपाल पाठविण्याच्या भारतातील या योजनेचे प्रवर्तक रफी  अहमद किडवाई यांचे छायाचित्राबरोबर हवाई टपाल योजनेचे विमान असे चित्र टाकून ‘ऑल अप’ या त्यांच्या चळवळीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त १ एप्रिल १९६९ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. गडद निळ्या रंगातील या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.


श्रीरामपूर कॉलेज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

जहाज बांधणीचे प्रसिद्ध भारतीय इंजिनियर ए. सी. वाडिया यांच्या स्मरणार्थ २७ मे १९६९ रोजी पोस्टाचे तिकीट काढण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यावर वाडिया यांच्या छायाचित्रा समवेत पाण्यावर तरंगणारी जहाजे दाखविण्यात आली आहेत. काळसर हिरव्या रंगात या तिकीटाची छपाई असून २० पैसे किंमत आहे. श्रीरामपूर कॉलेजला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ७ जून १९६९ रोजी पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. या तिकीटावर कॉलेज इमारतीचे छायाचित्र टाकण्यात आले असून जांभळट ब्राऊन रंगात याची छपाई करण्यात आली आहे. २० पैसे किमतीचे हे तिकीट आहे.


स्वातंत्र्यवीर सावरकर

नवीन विश्व डाक संघाच्या मुख्य कार्यलयाच्या इमारतीच्या छायाचित्राचे तिकीट २० मे १९७० रोजी प्रकाशित करण्यात आले. हिरव्या काळ्या रंगात छापण्यात आलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. शेर शहासूरी या १५ व्या शतकातील राज्यकर्त्याच्या स्मरणार्थ २२ मे १९७० रोजी त्यांचे छायाचित्राचे तिकीट प्रकाशित करण्यात आले. हिरव्या रंगात छापण्यात आलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त सावरकर यांचे छायाचित्र आणि अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना ते ज्या तुरुंगात होते त्या सेल्यूलर जेलचे चित्र अशा एकत्र छायाचित्राचे पोस्टाचे तिकीट प्रकाशित करून त्या स्वातंत्र्य सूर्याला आदरांजली अर्पण करण्यात आली.


वाय. डब्ल्यू. सी. ए.

२० जून १९७५ रोजी ‘वूमन’ आणि ‘वाय. डब्लू. सी. ए.’ या संस्थेच्या गौरवार्थ तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. ‘इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन अॅण्ड ड्रेनेज’ यांच्या वर्धापन दिनानिमित्त २८ जुलै १९७५ रोजी संस्थेचे बोधचिन्ह वापरून तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. ‘सॅटलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपरिमेंट’ यांचे अभिनंदन करण्यासाठी १ ऑगस्ट १९७५ रोजी त्यांचे बोधचिन्ह वापरून तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.



जन्मशताब्दी निमित्त

२७ सप्टेंबर १९७३ या दिवशी आर. सी. दत्त यांच्या स्मरणार्थ तिकीट काढण्यात आले. ब्राऊन रंगात छापण्यात आलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. प्रसिद्ध भारतीय क्रिकेट खेळाडू के. एस. रणजित सिंहजी यांच्या स्मरणार्थ २७ सप्टेंबर १९७३ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. हिरव्या रंगात छापलेल्या तिकीटाची किंमत ३० पैसे इतकी आहे. २७ सप्टेंबर १९७३ ला विठ्ठलाभाई पटेल यांच्या स्मरणार्थ त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित केले. लालसर ब्राऊन रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत ५० पैसे आहे.


अमीर खुसरो

प्रसिद्ध कवी अमीर खुसरो यांच्या ६५० व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट २४ ऑक्टोबर, १९७५ रोजी प्रकाशित करण्यात आले. लालसर ब्राऊन आणि पिवळ्या रंगात छापण्यात आलेल्या या तिकीटाची किंमत ५० पैसे आहे. माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे छायाचित्र असलेले  तिकीट २४ ऑक्टोबर, १९७५ रोजी प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ऑलिव्ह ग्रीन आणि काळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. बहादुरशाह जफर यांच्या जयंती निमित्ताने २४ ऑक्टोबर, १९७५ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. या तिकीटाची बहादुरशाह जफर यांनी उर्दूत लिहलेल्या काव्यपंक्ती असून पिवळसर ब्राऊन, काळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत १ रुपया आहे.



मायकेल एन्जेलोची अद्वितीय कलाकृती

जगप्रसिद्ध चित्रकार मायकेल एन्जेलो यांच्या ५०० व्या जयंतीनिमित्त त्यांची अप्रतिम कलाकृती असलेल्या चित्राची चार तिकीटाची मालिका प्रसिद्ध करण्यात आली. या निमित्ताने या महान कलाकाराचा गौरवही करण्यात आले. चाररंगी छपाईच्या असलेल्या एका चित्राचे चार भागात तिकीट प्रकाशित करण्यात आले. प्रत्येक तिकीटाची किंमत ५० पैसे आहे.



भरतपूर पक्षी भरण केंद्र

बिहारचे नेते व माजी मंत्री ललित नारायण मिश्र यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ३ जानेवारी १९७६ रोजी त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले. ब्राऊन, ग्रे, पर्पल आणि काळ्या रंगात छापलेल्या या तिकिटाची किंमत २५ पैसे आहे. जिम कार्बेट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाघाचे चित्र असलेले तिकीट २४ जानेवारी १९७६ रोजी प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. भरतपूर येथील पक्षी भरण स्थळातील पक्षांचे छायाचित्र असलेले तिकीट १० फेब्रुवारी, १९७६ रोजी प्रकाशित करण्यात आले. चार रंगातील या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.


माजी राष्ट्रपती डॉ. जाकिर हुसेन

देशभक्त आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. जाकिर हुसेन यांच्या स्मरणार्थ ११ जून १९६९ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. सेपिया रंगात छापण्यात आलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे, शेतीच्या अवजारांचे उत्पादक, प्रशिद्ध उद्योगपती लक्ष्मनराव किर्लोस्कर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकारने २० जून, १९६९ रोजी लक्ष्मनराव किर्लोस्कर यांचे छायाचित्र आणि शेतीच्या अवजारांचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले असून त्यायोगे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. काळसर राखाडी रंगात या तिकीटाची छपाई असून त्यांची २० पैसे किंमत आहे.

ऑलिम्पिक खेळ

१९७६ मध्ये २१ व्या ऑलिम्पिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या निमित्ताने भारत सरकारने ऑलिम्पिक खेळांवर आधारित असलेली चार तिकिटांची मालिका १७ जुलै, १९७६ रोजी प्रस्तुत केली. त्यापैकी पहिल्या तिकिटावर ऑलिम्पिकचे पाच कडी असलेले बोधचिन्ह गोलातील चौकोनात दर्शवून ऑलिम्पिक स्पर्धाची ओळख करून दिली आहे. चार रंगात छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. या मालिकेतील दोन नंबरच्या तिकिटात यातील अनेक स्पर्धामधील गोळाफेक या स्पर्धेतील संकेतात्मक चित्र या तिकिटावर घेण्यात आले असून त्या खाली ऑलिम्पिकचे पाच कडी असलेले बोधचिन्ह दर्शविले आहे. चाररंगी छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत १ रुपया आहे.


भारतातील राष्ट्रीय डाक तिकीट प्रदर्शन

बेट्होवन यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने १६ डिसेंबर १९७० रोजी तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नारंगी व राखाडी काळ्या रंगात छापण्यात आलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. भारतीय डाक तिकीट प्रदर्शनाच्या निमित्ताने दोन तिकीटाची मालिका प्रकाशित करण्यात आली. पहिल्या तिकिटावर दोन लहान मुले प्रदर्शनातील तिकिटांचे निरीक्षण करतानाचे छायाचित्र असून ते चार रंगात छापलेले आहे. या तिकीटाची किंमत २० पैसे  आहे. मालिकेतील दुसरे तिकीट हे तिकीट धरलेला हात आणि बहिग्रोल भिंगाने तिकिटाचे निरीक्षण करतानाचे छायाचित्र असलेले चार रंगात छापलेले हे तिकीट असून त्याची किंमत १ रुपया आहे.


सुंदर पक्षांची मालिका

१५ डिसेंबर १९६८ या दिवशी नौसेना दिनाच्या निमित्ताने भारतीय नौदलातील लढाऊ जहाज ‘निलगिरी’ याचे छायाचित्र छापून नौसेना दलाचा गौरव व्यक्त करण्यासाठी तिकीट प्रकाशित करण्यात आले. निळसर ग्रे रंगात हे तिकीट छापलेले असून २० पैसे किमतीचे आले. त्यानंतर रंगीबेरंगी अशा सुंदर पक्षांची चार तिकीटाची मालिका ३१ डिसेंबर १९६८ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यातील पहिले तिकीट हे लांब शेपटी, मानेशी नीळा रंग आणि पिवळी चोच असलेल्या ‘नीलकंठ’ पक्षाचे प्रकाशित करण्यात आले. चार रंगी छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. दुसरे तिकीट लांब चोच, डोक्यावर लाल तुरा, ब्राऊन रंगाचे पंख आणि पोटाशी बिस्कीट रंग असलेल्या कठफोडा पक्षाच्या छायाचित्राचे छापण्यात आले असून या तिकीटाची किंमत ५० पैसे आहे.

डॉ. मॅान्टेसरी

संयुक्त राष्ट्र संघाचा २५ व्या वर्धापन दिनानिमित्त २६ जून १९७० रोजी पृथ्वीचा गोल आणि संयुक्त राष्ट्र संघाचे बोधचिन्ह असलेले तिकीट प्रकाशित करण्यात आले. न्यू ब्ल्यू रंगात हे छापण्यात आले असून त्याची किंमत २० पैसे आहे. १९७० हे वर्ष आशियाई उत्पादकता वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने कारखान्यांचे चिन्ह आणि उत्पादकतेचे बोधचिन्ह टाकून १८ ऑगस्ट १९७० रोजी हे तिकिट प्रकाशित करण्यात आले. व्हायोलेट रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे. शिक्षणतज्ज्ञ मारिया मॅान्टेसरी यांच्या जन्मशताब्दी निमित्त शैक्षणिक बोधचिन्ह आणि मारिया मॅान्टेसरि यांचे छायाचित्र टाकून ३१ ऑगस्ट १९७० रोजी तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. हलक्या जांभाळ्या रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २० पैसे आहे.

अॅग्री एक्स्पो ७७

‘अॅग्री एक्स्पो ७७’ ह्या दिल्लीत भरविण्यात आलेल्या शेतीप्रदर्शनाच्या निमित्ताने भारतातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी १३ नोव्हेंबर, १९७७ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. मक्याचे कणीस आणि त्याचे तंतू याचे शेतकी विषयक बोधचिन्ह असलेले तिकीट निळसर हिरवट रंगात छापण्यात आले असून त्याची किंमत २५ पैसे आहे. राष्ट्रीय बालकदिनानिमित्त १४ नोव्हेंबर, १९७७ रोजी दोन तिकिटांची मालिका प्रकाशित करण्यात आली. त्यातील पहिले तिकिट हे लहान मुलांनी काढलेल्या चित्राचे असून चार रंगात छापण्यात आले आहे. याची किंमत २५ पैसे आहे. ह्या मालिकेतील दुसरे तिकीट बाकावर बसलेल्या दोन मित्रांचे चित्र असून हे ही चित्र लहान मुलांनीच काढलेले आहे. चाररंगी छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत १ रुपया आहे.